Aurangabaad Shivjayanti 2022 l देशातील सर्वात उंच शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण | Sakal

2022-02-19 116



औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. औरंगाबादेतील क्रांती चौकात हा पुतळा बसवण्यात आला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. छत्रपती शिवरायांचा हा पुतळा देशातील सर्वात उंच असून पुतळ्याची उंची 21 फूट आहे. या पुतळ्याचे वजन 7 मेट्रिक टन इतके असून ब्राँझ धातूपासून पुतळ्याची बनवण्यात आला आहे. चौथऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची 52 फूट असून चौथऱ्याच्याभोवती 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती आणि भोवताली कारंजे तयार करण्यात आले आहेत. पुतळा अनावरणासाठी चौकात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाईस ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी यावेळी पहायला मिळाली. तर जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. (chhatarapati-shivaji-maharaj-jayanyti-2022-unveiling-of-the-statue-of-shivaji-maharaj-in-auranagabad)


Free Traffic Exchange

Videos similaires